यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर…
यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :-
राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.
जिल्हा युवा अधिकारीपदी डॉ. प्रसन्न रंगारी (आर्णी, राळेगाव विधानसभा), जिल्हा समन्वयकपदी विक्रांत चचडा (आर्णी, राळेगाव विधानसभा) यांची उपजिल्हा युवा अधिकारीपदी अनुप भालेराव (राळेगाव विधानसभा), आकाश राठोड (आर्णी विधानसभा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तालुका युवा अधिकारीपदी अमोल राऊत (राळेगाव तालुका), मिथुन पुटे (कळंब तालुका), मनोज भुजाडे (बाभूळगाव तालुका), राहुल आडे (घाटंजी तालुका) तर शहर युवा अधिकारीपदी योगेश मलोंडे (राळेगाव शहर), शुभम खंदारे (कळंब शहर), अतीश तातेड (बाभूळगाव शहर), मुशरात खान (घाटंजी शहर), वृषभ महले (पांढरकवडा शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा युवा अधिकारीपदी विशाल पांडे (उमरखेड, पुसद, वणी विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारीपदी अजिंक्य शेंडे (वणी विधानसभा), प्रवीण कदम (पुसद विधानसभा) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तालुका युवा अधिकारीपदी हर्षद साकला (पुसद तालुका), कपिल चव्हाण (उमरखेड तालुका), संभाजी गोरटकर (उमरखेड तालुका), राम तंबाखे (महागाव तालुका) तर शहर युवा अधिकारीपदी वैभव सुने (पुसद शहर), गोपाल कलाने (उमरखेड शहर), ओम पुसुंगवार (महागाव शहर), नितीन बैस (ढाणकी शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा युवा अधिकारीपदी विशाल गणात्रा (यवतमाळ, दिग्रस विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारीपदी सुशांत इंगोले (दिग्रस विधानसभा), गिरिजानंद कळंबे (यवतमाळ विधानसभा) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तालुका युवा अधिकारीपदी विजय इंगळे (यवतमाळ तालुका-शहर), पवन शेंद्रे (यवतमाळ तालुका-ग्रामीण), जगजीत राठोड (दिग्रस तालुका), प्रवीण भगत (दारव्हा तालुका), सुजित पुंभारे (नेर तालुका) तर शहर युवा अधिकारीपदी नीलेश बेलोकर (यवतमाळ शहर), भूषण काटकर (यवतमाळ शहर), राहुल महाजन (दिग्रस शहर), तुषार कांबळे (दारव्हा शहर), रूपेश गुल्हाणे (नेर शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.