शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला

रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
९४२३७०३८३१
पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणून त्यांच्यासमोर छम छमा छम करण्याचे कृत्य शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उमरखेड विधानसभेमध्ये भाऊच्या आशीर्वादाने करण्याचे ठरले आहे. यासाठी लाखोंची वसुली प्रत्येक शासकीय कार्यालयात केली असल्याची शिस्तीच्या पक्षातील कार्यकर्त्यांकडूनच बोलल्या जात आहे. नाव न छापण्याच्या अटीवर या विधानसभेमधील पोलीस प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी खुद्द दस्तुर पॉलिटिक्स स्पेशल जवळ बोलून दाखविले आहे, तसे कॉल रेकॉर्डिंग पॉलिटिक्स स्पेशल जवळ आज मितीस उपलब्ध आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये मागास्वर्गीय उमरखेड विधानसभेमध्ये भाऊ श्रीकृष्णाची भूमिका घेऊन दहीहंडी फोडीत आहेत. या दहीहंडीमध्ये गौतमीचा छम छम छम असा नृत्य अविष्कार सादर करून भाऊ विधानसभेतील कोणत्या गोपियांना दहीहंडीचा संदेश देऊ इच्छित आहे हा मात्र संशोधनाचा विषय.
हल्ली भाऊ म्हणजे भाऊ आणि भाऊ याशिवाय उमरखेड विधानसभेमध्ये विद्यमान आमदाराला ही किंमत नाही असे बोलल्या जाते. परंतु भाऊंना हे माहीत नाही की लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला अतिशय मोठे महत्त्व आहे. परंतु भाऊंनी या विधानसभेमध्ये लोकशाहीच्या गळ्याचा घोटच घेतला आहे. भाऊंच म्हनणे कोण आमदार? कुठला आमदार? काय घेणे? काय देणे? शेवटी निवडून कोणी आणले? मी म्हणजे भाऊंनीच
परंतु भाऊ आपण कुणाच्या भरोशावर ही लढाई जिंकले आहो?
भाऊंच्या समाजाची या जिल्ह्यमधे मते किती? त्यातल्या त्यात उमरखेड़ विधान सभे मधे बोटावर मोजन्या इतकी. जिल्ह्यांमध्ये हा जिल्हा आदिवासीबहुल मराठा बहुल ओबीसी बहुल तर आहे कुठे अल्पसंख्याकांची मते? परंतु भाऊंना चाहणारा अल्पसंख्यांक वर्ग फार मोठा आहे. परंतु भाऊंनी मीच सर्वे सर्वा असल्याचे आव आनत आहेत. भाऊंनी विद्यमान माजी आमदार नामदेव ससाने यांचे टिकीट कापून नवखे किसनराव वानखेडे यांना तिकीट मिळवण्यासाठी उमरखेड महागाव मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ पाठवून ससाने यांचे तिकीट कापून वानखेडे यांचे तिकीट मागितले ही बाब सर्वश्रुत आहे. खरे तर मागील दोन टर्म मध्ये 2014 मधे भाजपाचे राजेंद्र नजरधने निवडून आले नंतरच्या 2019 मध्ये नामदेवरावजी ससाने भाजपाकडून निवडून आले. भाऊंना ज्या जनतेने बहुमताने निवडून दिले ते माजी आमदार तथा त्या काळातील विद्यमान आमदार पुढील विधानसभा निवडणुकीच्या काळात का चालत नाहीत?
म्हणजेच भाऊंना ताटाखालचे मांजर पाहिजे का? मागासवर्गीय मतदारसंघांमधून निवडून आलेल्या उमेदवार आमदार पदावर विराजमान झाल्यानंतर भाऊंना त्यांची आमदारकीची कारकीर्द का जड जाते? असा प्रत्येक वेळेस उमरखेड विधानसभेमध्ये भाजपाचा उमेदवार बदलला जातो पण भाऊंच म्हणन मी म्हणजेच सर्वस्व.
सर्व आमदार आपल्याच कडे, काय पाहिजे शेवटी भाऊंना? मागासवर्गीयाच्या मतदारसंघांमधून निवडून आलेल्या आमदाराच्या भरोशावर आपले राजकीय जीवन चालवायचे आहे का? खरे बघितले तर उमरखेड विधानसभेमध्ये राखीव निवडून आलेले आमदार भाऊंच्या हातातले बाहुले ठरतात आणि भाऊ प्रत्येक वेळेस पक्षाकडे आपला बाळ हट्ट पकडून उमेदवारी बदलून आणतात. भाऊंना असा उमेदवार का लागतो की जो भाऊच्या इशाऱ्यावर नाचतो? जनहित,जनकल्याण,जन समस्या या विषयाशी विद्यमान आमदारांना काही देणे घेणे का नाही? केवळ मुंबईला जावयाचे असेल तर आमदारांना का भाऊची परवानगी घ्यावी लागते?
भाऊ म्हणजे उमरखेड विधानसभा आहे का असे असेल तर हा विधानसभा मतदारसंघ भाऊंच्या साठी केवळ राखीव केला का? ही बाब उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला भेडसावत आहे.
आगामी काळात हा मतदारसंघ भाऊंच्या इशाऱ्यावर नाचणार नाही. भाऊंना गुरमी केवळ द्रव्य बळाची आणि निवडणुकीमध्ये पक्षीय संघटन आणि द्रव्य बळ पक्षाकडून पुरविल्या जाते परंतु भाऊ असाविर्भाव आणतात की जसे काही मी आणि मी माझ्याच घरामधून हे सर्व काही करत आहे, असे जाणून भोळ्या भाबड्या मतदारांकडून द्रव्य बळाच्या भरोशावर या विधानसभेमध्ये मजाल मारण्यामध्ये सक्सेस ठरले. परंतु भाऊ आपण केवळ कटपुतलीचे धागेदोरे सांभाळणारे आहात हा विषय ध्यानात ठेवा. येत्या काळामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभेमध्ये आपली ओळख कुठे आहे ही शोधण्याची वेळ आपल्यावर येऊ नाही हीच रास्त अपेक्षा आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये भाऊ आपण अकरा लाखाची दहीहंडी करून शेतकऱ्यांमध्ये काय संदेश देणार आहात ही चर्चा सध्या उमरखेड महागाव विधानसभेमध्ये चर्चिल्या जात आहे तूर्तास इतकेच.