विज बिलाच्या माफीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकला भाजपाचा मोर्चा…

विज बिलाच्या माफीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकला भाजपाचा मोर्चा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच्या काळात किती विज वापरात आणल्या गेली त्याची प्रत्यक्षस्थळी येऊन पाहणी न करताच मनमानी पद्धतिने आकारणी केलेले बिले भरण्याची सक्ती करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कारभारास ग्राहक कमालीचे वैतागले आहेत.ती बाब लक्षात घेवून भाजपाचे वतीने संपूर्ण राज्यात विज बिल माफ करण्याची मागणी करण्यासाठी व कंपनी कार्यालयाला टाळे ठोकण्या करीता मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.5 फेब्रु.रोजी स. 11 वा.राज्य सरकारच्या विरुध्द निषेधाच्या घोषणा देत तालुका भाजपाचा मोर्चा पक्ष कार्यालया पासून निघून विद्युत वितरण कंपनी कार्यालयावर धडकला.
कोरोनाच्या विळख्यात अडकलेले सर्व सामान्य नागरीक व शेतकऱ्यांना भरमसाठ विज बिल आकारुन त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देणाऱ्या विद्युत वितरण कंपनीला धारेवर धरण्यासाठी व विज बिलात सवलत देवू अशी घोषणा करून दिलेला शब्द परत फिरवणा-या सरकारचा निषेध करीत भाजपा कार्यालयातून माहूरचे योगी प.पु. शामबापू भारती महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात धरमसिंग राठोड, युवानेते अॅड.रमण जायभाये,जिल्हा सरचिटणीस देवकुमार पाटील, तालुकाध्यक्ष अॅड दिनेश येऊतकर, धडाकेबाज शहराध्यक्ष गोपु भाऊ महामुने,सुमित राठोड,महीला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष अश्विनी पाटील,शहराध्यक्षा अर्चना दराडे,ज्योतीराम राठोड,नंदकुमार जोशी,अच्युत जोशी,अविनाश भोयर,राजू दराडे,विनोद सूर्यवंशी,संजय पवार, संजय पेँदोर, पद्मा गीर्हे,प्रतिभा पाटील,रंजना दीक्षित,रेणुका राठोर,अनिता कुमरे,प्रमोद सोनकर,किशोर राठोड,कैलाश फड, पवन शर्मा,अर्जून मोहिते,संतोष तामखाने,दत्ता दोनकेवार,सोनू तोडसाम,सोनू पाटील यांचेसह मोठया संख्येत कार्यकर्ते सहभागी झाले होते, उपवागिय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचे नेतृत्वात पो. नि.नामदेव रीठे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.अण्णासाहेब पवार,जाधव व त्यांच्या सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर शाखा अभियंता डी.व्ही.रापतवार यांनी मोर्चेक-यांचे निवेदन स्वीकारले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…