24 तासात 11 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 25 जून :-
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 9 जण पॉझेटिव्ह तर 11 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 653 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 9 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 644 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 58 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72692 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70848 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये नेर एक, पुसद दोन, यवतमाळ चार व झरी जामणी येथील दोन रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 77 हजार 414 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 04 हजार 614 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.73 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.38 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2238 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2238 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 27 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 550 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 12 रुग्णांसाठी उपयोगात तर 514 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 2 उपयोगात तर 1174 बेड शिल्लक आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…