24 तासात 4 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 30 जून :-
गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 9 जण पॉझेटिव्ह तर 4 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 768 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 9 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 759 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 48 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72727 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70893 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये महागाव येथील दोन, नेर एक, पांढरकवडा एक, पुसद तीन, उमरखेड एक व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 80 हजार 444 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 07 हजार 697 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.69 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.17 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1869 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1905 आहे. यापैकी 36 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1869 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 637 बेडपैकी 23 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 614 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 636 बेडपैकी 12 रुग्णांसाठी उपयोगात तर 624 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत…