एपीआय वर निलंबनाच्या मागणीसाठी तरुणाचा पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :७२४९४४४८८८
महागाव :
महागाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करून एपीआयला निलंबित करण्याच्या मागणीसाठी तरुणाने चक्क महागाव पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज (ता.१) सकाळी साडेदहाच्या सुमारास समोर आली आहे.याप्रकरणी पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. समाधान राऊत (२८) रा. कलगाव असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
काही दिवसापूर्वी तरुणाने कलगाव व महागाव तालुक्यातील सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती .त्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी समाधान राऊत महागाव पोलीस ठाण्यात गेले होते .त्यावेळी तेथील कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी पीडित तरुणाला मारहाण करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची आरोप तरुणाने केला. याप्रकरणी तरुणाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून निलंबनाची मागणी केली होती. कार्यवाही न झाल्यास ठाण्यात आत्मदहन करण्याचा इशारा तरुणांनी दिला होता. आज सकाळी दहाच्या सुमारास तरुण पेट्रोल भरून असलेली बॉटल घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचला. याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी समाधान राऊत याला ताब्यात घेत त्याच्या जवळील पेट्रोलची बॉटल जप्त केली व त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचारी समजूत काढत असताना गंभीर पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याने व ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आले नसल्याने तक्रार बेदखल होत असल्याचा आरोप केला. जप्त केलेले पेट्रोलची बॉटल अंगावर ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस व उपस्थित पत्रकारांच्या सतर्कतेमुळे पीडित तरुणाला सदर घटनेपासून परावृत्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.पोलिसांनी पीडित तरुण समाधान राऊत याला ताब्यात घेतली असून वृत्तलेपर्यंत त्याची समजूत करण्याचा प्रयत्न सुरू होता.मात्र पीडित तरुण आत्मदहनावर ठाम होता. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आत्मदहन मागे घेणार नसल्यावर तो ठाम होता.
चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई केल्या जाईल.
महागाव पोलीस स्टेशनमध्ये जो प्रकार घडला त्याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी केल्या जाईल व तो अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील.
अशी माहिती प्रदीप पाडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांनी प्रसारमाध्यमांना दिली.