माहूर येथील बुद्धभूमी परिसरात सभागृह बांधकामसाठी निधी द्या…! आकाश कांबळे यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन…

माहूर येथील बुद्धभूमी परिसरात सभागृह बांधकामसाठी निधी द्या…!
आकाश कांबळे यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- माहूर शहरातील बुद्धभूमी परिसरात वर्षभरात अनेक वेळा विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जातात मात्र परिसरात सभागृह नसल्याने सार्वजनिक कार्यक्रमास मोठ्या अडचणी येत असल्याने बुद्धभूमी परिसरात अद्यावत सभागृह नसल्याकारणाने अनेक समस्याना तोंड द्यावे लागते.सभागृहास निधी उपलब्ध करून दिल्यास बोद्ध परिसरातील आवश्यक तेवढी जागा उपलब्द असून त्यावर सभागृह बांधकाम केल्यास सार्वजनिक कार्यक्रम परिसरातील गरिबांचे लग्न सोहळे कमी खर्चात पूर्ण करता येईल. सभागृह बांधकाम करण्याकरिता योग्य त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना देण्यात आल्या आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…