शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम

Oplus_0
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
९४२३७०३८३१
यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रा मध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. मराठी नटी आणून स्टेजवर नाचवण्यात हा या दहीहंडीचा मोठा विशेष प्रकल्प जणू आहे अशे बोलल्या जाते. शासकीय कार्यालयातून लाखोंची वसुली करून या दहीहंडीचे नियोजन केल्या जात असल्याचे बोलले जाते. हल्ली भाऊ चे पाय जमिनीवर नाहीत,भाऊ म्हणजे सर्वे काही अशी स्थिती उमरखेड विधानसभेमध्ये होत आहे. उमरखेड महागाव विधानसभा ही मागासवर्गीय मतदार संघासाठी राखीव असताना या मतदारसंघांमध्ये लाखोंची दहीहंडी हा विषय चर्चेचा ठरत आहे. माजी आमदार राजे यांनी एक लाख 11000 ची दहीहंडी ठेवून या दहीहंडीचा शुभारंभ केला होता परंतु विधानसभेतील किंग मेकर भाऊंनीही दहीहंडी आजमितीस अकरा लाखावर नेऊन ठेवली आहे. हल्ली जिल्हा कार्यकारणी मध्ये सुद्धा भाऊंचाच बोलबाला होता अशी प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांकडून बोलल्या जाते. आमदार कुणीही असो शेवटी भाऊ म्हणेल तेच होईल जणू या मतदारसंघातील लोकशाही जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी यांची पक्षामध्ये काही किंमत नाही का? भाऊंनी सांगावे आणि इतरांनी करावे अशी भूमिका आजमीतीस उमरखेड विधानसभेमध्ये आहे. मागील वर्षी देखील लाखांच्या दहीहंडीमध्ये सुप्रसिद्ध मराठी नटी गौतमी पाटील यांना स्टेजवर आणून छम छमा छम नृत्य करून अनेकांना भवळ घालण्याचा प्रयत्न भाऊंनी केला. येणाऱ्या 21 ऑगस्टला गौतमी पाटील यांचा नृत्यातून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला भाऊ कोणता संदेश देणार आहेत हा विषय जनतेला पडलेला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाऊंची मोठी गळचेपी झाली होती, परंतु भाऊंच्या निष्ठावंतांनी भाऊची भिस्त राखली. उमरखेड महागाव विधानसभेला नक्की असलेले विद्यमान आमदार किसनराव वानखेडे यांना या दोन तालुक्यात कुणीही ओळखत नव्हते परंतु पक्षीय बरोबर लाडकी बहीण व भाऊचे निष्ठावंत यांनी या विधानसभेत पुनश्च भाजपाला गुलाल लावला. असे जरी असले तरी भाऊंची शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील अकरा लाखाची दहीहंडी हा प्रश्नाचा विषय जनतेसाठी ठरला आहे.
आजची परिस्थिती बघितली असता उमरखेड महागाव विधानसभेमध्ये शासकीय कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. कधी नव्हे तो भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठण्यामध्ये या दलालांचा यामध्ये फार मोठा वाटा आहे. एक नवे अनेक किस्से या विधानसभेमध्ये नियमित घडत आहेत.
वडद येथील तलावां मधील गाळ काढण्यामध्ये कोट्याधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलल्या जाते. भाऊ या दोन्ही तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर रुबाब दाखवून अनेक खोटे नवे बिले काढण्यामध्ये समाविष्ट आहेत. भाऊंनी जणू यांना या विषयासाठी नियुक्त केल्याचे बोलल्या जाते. पूर्वी कधीतरी इरफान भाई फिरोज भाई असे अनेक वसुली धारक नियुक्त करून कोट्यावधीची वसुली केल्या जात होती, परंतु आता गजू शिके बीके अनेक व्हीआयपी ची यामध्ये नावे आहेत.
सध्या दहीहंडी करिता द्रव्यबळ जमा करण्यामध्ये अनेकांचे हात आहेत. भाऊंची दहीहंडी ही नेहमीच ढोल ताशाच्या गजरामध्ये व पक्षीय व्हीआयपी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होते. असे असले तरी जिल्ह्यातील उमरखेड विधानसभेमध्ये अनेक शेतकरी समस्या आहेत. नुकताच गेलेला नागपूर-तुळजापूर महामार्ग व प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन जात आहे, परंतु भाऊंचे याकडे काहीही लक्ष नाही. जमादार,बीट जमादार,ठाणेदार यांच्याकडून लाखोंची वसुली करून या दहीहंडीमध्ये दही लोणी भरण्याचे काम भाऊंच्या समर्थकांकडून सुरू आहे.
उमरखेड विधानसभेतील विद्यमान आमदारांना निवडून देण्यामध्ये महागाव तालुक्यातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. अनेक गावातील मतदान केंद्रांची स्थिती बघितली असता विद्यमान आमदाराच्या पक्षाला फार मोठे मताधिक्य जनतेने दिले परंतु हल्ली या तालुक्याकडे होणारे फार मोठे दुर्लक्ष याचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समितीमध्ये दिसण्याचे संकेत आहेत. ज्या हिंदुत्व संघटनांनी जीवाचे रान करून विद्यमान आमदारांना निवडून आणले आज त्या संघटनांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे, त्या त्या संघटनांकडून बोलल्या जाते.
महागाव शहरात स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या तेलचित्राजवळ दारूभट्टीची महागाव नगरपंचायतने दिलेली एनओसी हा विषय तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तालुक्यातील जनता उपोषणाला बसून चक्काजाम केल्याने सद्यस्थितीला ही एनओसी स्थगित केली असल्याचे बोलल्या जाते.
परंतु भाऊ आणि आमदारांनी याबद्दल शब्दही काढला नाही. जनहितार्थ व जनतेच्या सोबत आमदार व भाऊ कधीही दिसले नाही हीच का या तालुक्या बद्दल निष्ठा?
ज्या तालुक्यांनी हजारोच्या संख्येने लीड देऊन विद्यमान आमदारांना निवडून आणण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली. असे असेल तर शेवटी विरोधी पक्ष व जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल.
नुकतेच या विधानसभेमधील अंबोडा येथे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी पायी दिंडी काढून फार मोठे आंदोलन केले. आंदोलन शेतकरी कर्जमाफी करिता होते, परंतु आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केले व भाऊंनी सुद्धा याकडे कोणतेही लक्ष दिले नाही. ज्या शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले त्यांच्या पक्षाला या विधानसभेमध्ये विजयी केले अशा शेतकऱ्यांच्या समस्येकडे विशेष दुर्लक्ष करण्यात आले. मागील वर्षी झालेल्या दहीहंडीमध्ये जिल्ह्यातील घाटंजी केळापूर येथील माजी आमदारांनी केवळ ठेका धरला होता त्या माजी आमदार ला पक्षाने तिकीट नाकारले. परंतु ज्या पक्षातील भाऊंकडून या दहीहंडीमध्ये गौतमीचा छम छम छम असे नृत्य आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उरावर टाचून केल्या जाते अशा भाऊंवर पक्षातून कोणतीही कारवाई का होत नाही? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
हल्ली भाऊंची भाऊगिरी या विधानसभेला मोठी महाग पडत आहे. भाऊच्या विरोधात कुणी आवाज उठविला तर त्यांचा पंगा भाऊशी आहे. भाऊचा थाट म्हणजे आमदारांना लाजवेल असा आहे या दहीहंडी करिता महसूल पोलीस प्रशासन,कृषी पंचायत समिती, वनविभाग आता अनेक शासकीय कार्यालयातून लाखोंची गंगाजळी या दहीहंडीकरिता जोरजबरीने वसुली केल्या जात आहे असे बोलले जाते.
विद्यमान आमदारां कडे दिसते परंतु भाऊचा दरबार गजबजलेला असतो. त्यामध्ये कंत्राटदारांची फार मोठी संख्या आहे. ज्या कंत्राटदारांनी भाऊंना आपला आका मानले,तेच कंत्राटदार आज मालोमाल आहेत. ज्यांनी भाऊचा शब्द टाळला त्यांना भाऊच्या दरबारात धारा नाही. कामे येण्याअगोदरच द्रव्य बळ देऊन ही कामे भाऊच्या मर्जीतील कंत्राटदार आरक्षित करीत आहेत. त्यामध्ये काही छोटे निष्ठावंत कार्यकर्ते कंत्राटदार यांना छोटे-मोठे काम घेण्यातही भाऊंच्या चेल्या चपात्यांच्या घराभोवती चक्रा माराव्या लागत आहेत. कधी नव्हे ते स्थिती या विधानसभेची झालेली आहे. या सर्व बाबीकडे शिस्तीतील पक्ष म्हणून जनतेकडून बघितल्या जाते अशा पक्षाने या बाबीकडे गंभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे तालुक्यातील सुज्ञ नागरिकाकडून करून बोलले जाते.