हिवरा ग्रामपंचायत चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार हिवरा येथे एकूण 76 % मतदान
हिवरा ग्रामपंचायत चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार हिवरा येथे एकूण 76 % मतदान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम :-
हिवरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार प्रभागात दहा जागेसाठी झालेल्या लढतीत आज दिनांक 15 जानेवारीला हिवरा येथे एकूण 3007मतदारांपैकी तब्बल 2304 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मतदानाची एकूण टक्केवारी 76 टक्के आहे
वार्ड क्रमांक एक मध्ये एकूण826 मतदारांपैकी एवढ्या 626मतदारांनी ,वार्ड क्रमांक दोन मध्ये 769एकूण मतदारांपैकी 601एवढ्या मतदारांनी, वार्ड क्रमांक 3 मध्ये एकूण 678मतदारांपैकी509 एवढ्या मतदारांनी तर वार्ड क्रमांक 4 मध्ये एकूण 734 मतदारांपैकी 568एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
अतिशय चुरस पूर्ण झालेल्या या लढतीत दोन्ही पॅनल प्रमुखांनी आपले उमेदवार निवडून येतील याचे गणित बांधले आहे सर्वाधिक चुरस प्रभाग क्रमांक एक मध्ये बघायला मिळाली इथे एकूण826 मतदारांपैकी तब्बल 626 म्हणजेच चीची75% मतदारांनी हक्क बजावला यादरम्यान कोणत्या पॅनलचे किती उमेदवार निवडून येतील सरपंचाचे आरक्षण काय निघेल, कोण सरपंच होईल यासाठी नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे येत्या 18 तारखेला होणार्या निकालाकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.