खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मानव विकास योजनेंतर्गत मुलींसाठी मोफत बससेवा
खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मानव विकास योजनेंतर्गत मुलींसाठी मोफत बससेवा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :-
खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने महागाव तालुक्यातील शालेय विद्यार्थिनीसाठी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरु करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित होत्या .
महागाव-नांदगव्हाण-बेलदरी-कोठारी-हिंगणी-मुडाना-महागाव मार्गावरील अनेक विद्यार्थिनी शाळा कॉलेज करिता महागाव , उमरखेड येथे ये -जा करत असत परंतु गतवर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वच बससेवा बंद करण्यात आल्या दरम्यानच्या काळात शाळा महाविद्यालय पण बंद करण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा टप्याटप्याने शाळा कॉलेज सुरु झाले पण ये जा करण्यासाठी वाहनांची सोय नसल्याने अनेक शाळकरी मुली शिक्षणापासून वंचित होत्या याबाबत महागाव तालुक्यातील विविध संघटनांनी आणि पालकांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कडे बससेवा सुरु करण्याबाबत मागणी केली,असता खासदार हेमंत पाटील यांनी गांभीर्यन लक्ष देऊन याबाबत यवतमाळ राज्य परिवहन विभागाला संपर्क करत मानव विकास मिशन योजनेंतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी मागणी करत निर्देशित केले आणि तात्काळ या मागणीची दखल घेऊन बससेवा सुरु करण्यात आली. यामुळे तब्बल १०-१५ गावातील विद्यार्थिनींना या बससेवेचा लाभ मिळणार आहे . याबाबत सर्व गावातील गावकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले.याकामी खासदार हेमंत पाटील यांचे उमरखेड- महागाव जनसंपर्क अधिकारी चंद्रसेन आढागळे यांनी सहकार्य केले तसेच बसचे वाहक व चालक यांचा सत्कार खासदार हेमंत पाटील यांच्यावतीने करण्यात आला. बससेवेमुळे मुलीच्या शिक्षणाचा मार्ग सुखकर केल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी बेलदरी, कोठारी याठिकाणी बसचे स्वागत करून आनंद साजरा केला गेला . याप्रसंगी उत्तम गोरे, सुभाष आढागळे, माजी सरपंच सुनीता ,नारायण मार्कडे,पोलीस पाटील किसन नांदे,ग्रामसेवक बालाजी वानखेडे,पत्रकार सदानंद लाहेवार,विनोद जाधव,प्रेम नाईक,परमेश्वर जाधव,अनिल मार्कडे, राम राठोड,राहुल आढागळे,शिवाजी राठोड,अरविंद राठोड,अर्जुन राठोड, प्रमोद काळे,अनिल काळे,दत्तराव मार्कडे, गोविंद लाहेवार,प्रभाकर आढागळे,दत्ता आढागळे,गजानन आढागळे,भास्कर वाठोरे,आनंद राठोड, प्रमोद राठोड,माधव आढागळे,मारोती बेलखेडे,विलास काळे,विलास आढागळे,रोहिदास राठोड,भीमराव मार्कडे,दत्ता मनवर,अंकुश बेलखेडे,कोंडबा आढागळे,विष्णू चव्हाण,कुंदन जाधव,संजय चव्हाण, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.