“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सोलापूरमध्ये झालेल्या एका मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर महत्वाचं भाष्य केलं.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचं कौतुक केलं आणि त्यांना काही मोलाचा सल्लाही दिला.
दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींना एक मोठा इशारा देखील दिला. ‘तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे. मात्र, जर तुम्ही चुकलात, तर चुकीला माफी नाही हे लक्षात ठेवा’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार येथील जनता आहे. या निवडणुकीच्या विजयाचे दुसरे शिल्पकार आपल्या भाजपाचे कार्यकर्ते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं, आव्हानांचा सामना केला. त्यांच्या सोबतीला आपल्या आमदारांची फौज देखील होती. भाजपाला मिळालेला विजय हा विकासाचा विजय आहे. ज्यांचा विकासावर विश्वास आहे, त्यांचा हा विजय आहे. मोदींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा हा विजय आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना फडणवीसांनी दिला सल्ला
“निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना मी सांगतो की आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण स्वत:मुळेच निवडून आलो. असा समज आपला असतो. मात्र, यामधूनच आपला व्यवहार बदलत जातो. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात, तसं लोक तुम्ही केलेला व्यवहार देखील पाहतात. एकवेळा विकास कमी झाला तरी चालतो, पण जनतेबरोबर तुमचा व्यवहार कसा आहे? हे जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे जनतेला विश्वास वाटला पाहिजे की आपण भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडे गेलो तर आम्हाला सन्मान मिळेल. आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. अशा प्रकारची भावना जनतेत तयार झाली पाहिजे”, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
‘…तर चुकीला माफी नाही’ : मुख्यमंत्री फडणवीस
“निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना सांगतो, भाजपाची परीक्षा मोदींनी काय काम केलं यावरून तर होणारच आहे. पण त्याचबरोबर स्थानिक पातळींवर लोकप्रतिनिधींचा जनतेसोबत व्यवहार कसा आहे? यावरूनही भाजपाची परीक्षा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पारदर्शक पद्धतीने काम झालं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाहीत. एखाद्याला पदावरून काढवं लागलं किंवा एखाद्याच्या हातातून एखादं पद गेलं तरी हरकत नाही. कारण लोकांनी आपल्याला पारदर्शक पद्धतीने काम करण्यासाठी निवडून दिलं आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही जर चुकलात तर चुकीला माफी नाही. हे देखील लक्षात ठेवा”, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल..!
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला ‘त्या’ चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण…..
विधान परिषदेसाठी मविआघडीचा उमेदवार ठरला..? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब….
‘खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट….
ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मोठी खेळी..? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….