‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- “‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बुलढाणा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा काढून पुस्तक वाचनाचा इशारा दिला होता.
मात्र पोलिसांनी त्यांना बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच चिखली येथे ताब्यात घेतले.
प्रशांत आंबी हे समर्थकांसह बुलढाण्याकडे रवाना झाले असताना शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली येथे पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान, बुलढाणा शहरात आंबी यांच्या समर्थनार्थ जमलेल्या शेकडो आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी “आमदार संजय गायकवाड मुर्दाबाद” अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. काही आंदोलकांना पोलिसांनी फरपटत नेत ताब्यात घेतल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यापूर्वी बुलढाणा शहर पोलिसांनी प्रशांत आंबी यांना नोटीस बजावत आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण करू नये, जात-धर्मावरून वक्तव्य करू नये तसेच कोणाच्याही भावना दुखावतील अशी भाषा टाळावी, अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही नोटिशीत देण्यात आला होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….
नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल..!