बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आता ५ मेपर्यंत बारावीचा आणि १५ मेपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेकजण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. पण, आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे एकाच पानावर मिळणार आहे. त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे.
याशिवाय त्यावर क्युआर कोड देखील असणार आहे. तो क्युआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डाने हा बदल केला असून त्यातून बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे. दरम्यान, आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणत: एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.
१७ मेपासून अकरावी प्रवेशाला सुरवात
गतवर्षीपासून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवली जात आहे. सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन अनेक विद्यार्थी कॉलेजला केवळ परीक्षेला जातात आणि वर्षभर कोचिंग क्लासला हजेरी लावतात. असे गैरप्रकार बंद व्हावेत, कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यात तफावत राहू नये हा त्यामागील हेतू आहे. यंदा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १७ मेपासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु होणार आहे. ऑनलाइन गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्यांना सुरवातीला महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. त्यादृष्टीने माध्यमिक शिक्षण विभाग नियोजन करीत आहे.

शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….
नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल..!
बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….