वीज वितरण अभियंत्याला शिवीगाळ प्रकरणी शिवसेना नगरसेवकांवर गुन्हा दाखल ; उपकार्यकारी अभियंता यांची फिर्याद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
वीज नसल्याचा कारणावरून उपकार्यकारी अभियंत्यास अश्लील शिवीगाळ करणाऱ्या शिवसेना नगरसेवकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना काल (ता.०१)रात्री बाराच्या सुमारास महागाव येथील बस स्थानक परिसरात घडली आहे.सुजितसिंह ठाकूर असे गुन्हा दखल झालेल्या स्विकृत शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे.
जनतेच्या हितासाठी जाब विचारले : नगरसेवक, सुजित ठाकूर
शहरातील दिवसभर लाईट बंद होती.रात्री लाईन सुरू करण्यात आला.परंतु एकता नगर मधील लाईन बंद असल्याची माहिती दिली.त्यामुळे उपकार्यकारी अभियंता यांनी अश्लील बोलणे सुरू केले.उलट पक्षी माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. जनतेच्या हितासाठी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.न्यायालयात दाद मागणार
प्राप्त माहितीनुसार , गुंज ते महागाव येणाऱ्या विद्युत वाहक तार जोडणी चे काम सुरु असल्याने दिवसभर विजेचा ब्रेकडाउन होता . रात्री साडेअकराच्या सुमारास लाईट सुरू करण्यात आली.अचानक लाईन सुरू होताच शहरातील एकता नगर मधील विद्युत रोहित्र जळून खाक झाले.दरम्यान वीज जोडणीचे काम आटपून महागाव कडे परत येणाऱ्या वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण हे आपल्या ताफ्यासह बस स्थानक चौकात आले.तेथे नागरिकांचा जमाव उपस्थित होता.त्यावेळी उपस्थितांपैकी शिवसेना नगरसेवक आणि उपकार्यकारी अभियंता यांच्यात लाईट नसल्याच्या कारणावरून वाद उफाळला.त्यावेळी शिवसेना नगरसेवक यांनी उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.त्यावरून उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांनी आज (ता.०२) सकाळी महागाव पोलीस स्टेशन ला शिवसेना नगरसेवक यांच्याविरोधात तक्रार दिली.त्यावरून शिवसेना नगरसेवक सुजित सिंग ठाकूर याच्याविरुद्ध भादवी १८६,२९४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…