निराधार, वृद्ध कलावंत आणि दिव्यांगाचे रखडलेले मानधन तात्काळ अदा करावे
भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
लॉकडाऊन वाढत असल्याने अनेकांना आता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, ज्याचा सर्वाधिक फटका निराधार, वृद्ध कलावंत आणि दिव्यांगांना बसत असल्याने त्यांना तात्काळ मानधन अदा करण्यात यावे अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे, सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे विशेषतः निराधार नागरिक, वृद्ध कलावंत आणि दिव्यांगाना याचा मोठा फटका बसत आहे. या घटकांसाठी शासनाने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ,अपंग कल्याण अश्या योजना कार्यान्वित केल्या, मात्र फेब्रुवारी पासून अनेकांना मानधन मिळालेले नाही, त्यामुळे निराधार, दिव्यांग यांच्या अडचणीत भरीत भर पडत असल्याने त्यांना तात्काळ मानधन देण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. याचबरोबर लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम त्यांना सुलभ पद्धतीने मिळवून देण्यासाठी बँकांनी लाभार्थ्यांना घरपोच मानधन देण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….