स्वस्त धान्य दुकानदाराच्या घरी तहसीलदाराची धाड ; संशयास्पद खोली सिल
परवाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी
अनिल बोम्पीलवार : ९४२३६४२४६३
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा संगम :
महागाव तालुक्यातील हीवरा संगम पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मौजे अनंतवाडी येथील एका रास्त धान्य दुकानदाराने काळ्याबाजारत विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या घरावर तहसीलदार यांनी धाड टाकत घर सिल केले आहे.सिल केलेल्या दुकानात शेकडो क्विंटल धान्य साठाही जप्त करण्यात आल्याने अफरातफर करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदरांचे धाबे दणाणले आहे.

यामागील पृष्ठभूमि अशी की,
मौजे अनंतवाडी येथील रास्त धान्य दुकानदार आर. टी.राठोड,हे लाभार्थ्यांना कमी मालं देवून धान्य काळाबाजारात विक्री करत आहेत. लाभार्थ्यांना वाटप केलेल्या धान्याचे बिल न देणे,ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरणे, व मागील एप्रिल महिन्यात धान्याचे वाटप कमी देणे अश्या अनेक विषायांन्वये गावातील सुज्ञ नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली.तक्रारीत सदर दुकानदारांने केलेल्या स्वस्त धान्याच्या गैरप्रकारांची चौकशी करून तात्काळ परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी रेटून धरली होती.चौकशी करून कार्यवाही न केल्यास आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसू असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने महागाव येथील तहसीलदार निलेश मडके व पुरवठा निरीक्षक दिनेश आडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी आज बुधवारी सकाळी ११ वाजता आकस्मित भेट दिली.त्यावेळी राठोड यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरात
तांदूळ १८ पोते (९ क्विंटल २५ किलो) व गहू ३३ पोते (१६ किंटल ५० किलो) धान्य संशयास्पद आढळुन आला.त्यामुळे धान्याचा पंचनामा करत साठवलेली धान्य खोली सिल करण्याची कार्यवाही तहसीलदार निलेश मडके यांनी केली आहे. सदर जप्त केलेला
धान्य साठा पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
कोरोना सारख्या गंभीर संकटाचा गोरगरीब जनता सामना करत असताना सरकार कडून मिळालेल्या धान्यात अफरातफर करून गोरगरिबांच्या टाळू वरील लोणी खाण्याचे प्रकार सद्या जिल्ह्यात उजेडात येत आहे.आता अनंतवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी अनेकांनी मागणी केली असून तहसीलदार यांच्या आकस्मित भेटी नंतर आता तहसीलदार

पुढील काय करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.परंतु याबाबत पॉलिटिक्स स्पेशल ने पुरवठा निरीक्षक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता उडवा उडवी ची उत्तर मिळत असल्याने कार्यवाही दडपण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा संशय वाढल्या जात आहे.वृत्त लीहे पर्यंत गुन्हा दाखल कार्यवाही करण्यात आली नव्हता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..