कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
इंस्टाग्राम पेज हॅक झाल्याचा, वैयक्तिक अकाउंटवरही अनधिकृत प्रवेश झाल्याचा तसेच एक्स (ट्विटर) अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याचा दावा दिपके यांनी केला. तसेच पक्षाच्या खात्यावरही कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय व्यंग आणि ऑनलाईन धमक्या या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दिपके यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, “कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई सुरू आहे. आमचे इंस्टाग्राम पेज हॅक झाले आहे. माझे वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटही हॅक करण्यात आले आहे. एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले असून बॅकअप अकाउंटदेखील हटवण्यात आले आहे.” त्यानंतर त्यांनी आणखी एका पोस्टद्वारे सध्या त्यांच्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश नसल्याचे स्पष्ट करत, पुढील कोणतीही पोस्ट अधिकृत समजू नये, असे आवाहन केले.
बोस्टनमध्ये वास्तव्यास असलेल्या दिपके यांनी यापूर्वीही धमक्या मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, “हा निर्णय माझा आहे, माझ्या कुटुंबाचा नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबाला काही होऊ नये, अशी माझी इच्छा आहे.” दिपके दोन वर्षांपूर्वी जनसंपर्क विषयाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. त्यांचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे राहते. त्यांनी दावा केला की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. “एका व्हिडिओमध्ये काही व्यक्ती आमच्या घराबाहेर पोहोचल्याचे सांगत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, भारताचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी “व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या परजीवी प्रवृत्ती” संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना करण्यात आली होती. १५ मे रोजी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी काही तरुणांची तुलना ‘कॉकरोच’शी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
वाद वाढल्यानंतर मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्टीकरण देताना आपण देशातील तरुणांवर टीका केली नसल्याचे स्पष्ट केले. “मी बनावट पदव्या घेऊन प्रतिष्ठित क्षेत्रांत प्रवेश करणाऱ्यांवर टीका केली होती. भारतातील तरुणांबद्दल मला अभिमान आहे,” असे त्यांनी म्हटले होते.

लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करा; गडकरींचा मोठा दावा- वाहने आता फक्त २५ रुपये दराच्या इंधनावर चालतील…
NEET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेले ११ पैकी ७ जण महाराष्ट्रातील ; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनीच ती कशी फोडली..?
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…