नायब तहसिलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीस नाशिकातून अटक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुख्यात गुंडास अखेर नाशिक येथून मोठ्या शिफातिने अटक करण्यात आली आहे.कुख्यात गुंड तथा रेती तस्कर अविनाश चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला उमरखेड पोलीस ठाण्यातील फौजदार पांचाळ यांच्या पथकाला तब्बल दोन आठवड्यानंतर या रेती माफियाच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.
याबाबत सविस्तर असे की,
दोन आठवड्यांपूर्वी मध्यरात्री उमरखेड येथे रेतीच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या पथकावर रेती माफिया अविनाश चव्हाण व साथीदारांनी नायब तहसीलदार यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. यात नायब तहसीलदार वैभव पवार गंभीर रित्या जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेडला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पथकात समाविष्ट असलेल्या तलाठ्यालाही किरकोळ इजा झाली होती. या घटनेनंतर चव्हाण याच्या आठ साथीदारांना लगेच पोलिसांकडून अटक करण्यात आली. मात्र मुख्य सूत्रधार असलेल्या अविनाश चव्हाण घटनेपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी महसूल कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन केले. अटकेसाठी १५ फेब्रुवारीचा अल्टीमेटम देण्यात आला होता. या तारखेनंतर राज्यभर तहसीलदार व नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी रेती माफिया अविनाश चव्हाणच्या अटकेसाठी जोरदार हालचाली पोलिसांनी केल्या. अखेर सोमवारी रात्री पोलिसांना अविनाश नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी मोठ्या शिफातीने त्याला अटक केली.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….