ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सह ऊर्जा सचिव व वीज कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माहुर यांना निवेदन….

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सह ऊर्जा सचिव व वीज कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माहुर यांना निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकीरण देशमुख
माहुर :-
कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात दि . २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती . या काळात महावितरण कडुन ना वीज मिटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले ना वीज देयके वितरित करण्यात आली . घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरपेक्षा तिप्पट – चौपट रकमेची अवाजवी व भरमसाठी वीजबिले पाठवली गेली . या वीजबिलांचे आकडेच इतके मोठे होते की ग्रामिण भागातील गोरगरीब जनतेस शहरातील मध्यमवर्गीयांनाही भोवळच आली ! करोना टाळेबंदीच्या दिवसांमध्ये व्यापार , उद्योग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असताना वीजबिलांची भरमसाठी रक्कम भरणं बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हतं . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री श्री . उद्धवजी ठाकरे आणि ऊर्जामंत्री श्री . नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या त्यानंतर ऊर्जामंत्री , राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या . प्रत्येक बैठकीनंतर वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ असं आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिलं .
ह्यामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभित झाली असुन प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे , याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री श्री . नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्याविरोधात फसवणुक व मानसिक आघात पोहोचण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले त्यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शेख आसिफ,मनविसे जिल्हाउपाध्यक्ष धनंजय आराध्ये,मनविसे माजी तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी, मनविसे माजी शहराध्यक्ष आशिष बाळसकर यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थीत होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…