ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना ड्रायफुडचे वाटप महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रुग्णांना ड्रायफूट वाटप ; पत्रकार कुडवे यांचा अभिनव उपक्रम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :
येथील ग्रामीण रुग्णालयातील गरीब,गरजवंत रुग्णांना शनिवारी दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी कृतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्त तसेच पत्रकार पुरुषोत्तम कुडवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ड्रायफुडचे वाटप करण्यात आले.
दिग्रस ग्रामीण रुग्णालयात अनेक आजारी रुग्ण दाखल होत असतात. सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणारे तसेच स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३० वी पुण्यतिथी तसेच पत्रकार पुरुषोत्तम कुडवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ड्रायफुडचे वाटप करून अभिनव उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
यावेळी पत्रकार लुकमान खान, पुरुषोत्तम कुडवे, लक्ष्मण टेकाळे, प्रफुल व्यवहारे, अजित महिंद्रे, साजिद पतलेवाले, पोलीस पाटील अरुण कोरडे, गोविंद पाटील,ऍड.राहुल तुपसुंदरे, शुभम चव्हाण, प्रा.प्रितम गावंडे, किशोर कांबळे, उमेश भटकर, ऋषिकेश हिरास, सदानंद जाधव, जितेश बुरकुंडे, आकाश काशिकर, किशोर कांबळे, डॉ. वीरेंद्र अस्वार, डॉ.हर्षिल जाधव, कोवे मॅडम, गणेश पऊळ, गणेश सोनवाल आदी उपस्थित होते.