जिल्ह्यात कोरोना चा १३ वा बळी ; तर 16 पॉझेटिव्ह रुग्णांची भर
यवतमाळ शहरातील 12 जण, नेर आणि पुसद येथील प्रत्येकी दोघांचा समावेश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ:जिल्ह्यात आज (दि.७) एकाच दिवशी १६ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ८६ वर पोहचली आहे. तर यवतमाळ शहरातील ५२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने मृत्युचा आकडा एकाने वाढून १३ झाला आहे.

मंगळवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १६ जणांमध्ये १२ जण यवतमाळ शहरातील असून दोन जण पुसद येथील आणि दोन जण नेर येथील आहे. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७ पुरुष व ५ महिला, पुसद येथील २ पुरुष आणि नेर येथील २ महिलांचा समावेश आहे. ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७१ होती. एका महिलेचा मंगळवारी मृत्यु झाल्याने ही संख्या ७० वर आली. मात्र नव्याने १७ जण पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ८६ झाली आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ११० जण भरती आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा ३४५ वर पोहचला आहे. यापैकी २४६ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात १३ जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी ४७ नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ६२०१ नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी ५७९५ प्राप्त तर ४०६ रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५४५० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….