माहूर येथे क्रिडासंकुलन नियोजित जागेची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी.

माहूर येथे क्रिडासंकुलन नियोजित जागेची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी.
माहूर/नांदेड,(राजकिरण देशमुख.)
अनेक वर्षापासून माहूर शहरातील क्रिडासंकूलन जागे अभावी प्रलंबीत असलेल्यामुळे शहरासह ग्रामिण भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी किंवा स्पर्धा घेण्याकरीता मैदानच उपलब्ध नसल्याने या गंभीर बाबी कडे शहरातील खेळाडू व प्रशिक्षक सुरेश गिऱ्हे यांनी लक्ष घालून मा.मुख्यमंत्री , क्रिडामंत्री,जिल्हाधिकारी आमदार भिमराव केराम साहेब यांना क्रिडासंकुलन करीता माहूर शहरासाठी ५ एकर जागा शासनाने उपलब्ध करुन द्यावी व त्यावर क्रिडासंकुलनांची निर्मिती करावी असे निवेदन दिले होते.या निवेदनाची दखल नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॕ.विपीन ईटनकर यांनी घेऊन क्रिडासंकुलनांकरीता शहरालगत५ एकर जागा त्वरीत उपलब्ध करुन दिली त्याच जागेची पाहणी दि.१७ फेब्रुवारी २०२१रोजी पाहणी करुन जागेची मोजनी,नकाशा व प्रशासकीय बाबी लवकर पुर्ण करुण अहवाल सादर करावा अशा सुचना तहसिलदारांना दिल्या लवकरच माहूर शहरासह,तालुक्यातील खेळाडूंना हक्काचे मैदान मिळेल त्यामुळे खेळाडू व प्रशिक्षक सुरेश गिऱ्हे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.या क्रिडासंकुलन जागेसाठी पाहनी दौ-यावेळी माहूरचे तहसिलदार वरणगावकर , न.पं.मुख्याधिकारी विद्याताई कदम,तलाठी काळे यांच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…