आर्ची ची झलक बघण्यासाठी उसळली तरुणाई; माहूरच्या हेलिपॅडवर आर्ची चे भव्य स्वागत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख –
माहूर जि.नांदेड
सैराट चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या तरुणाला येड लावलेल्या आर्ची उर्फ रिंकू राजगुरू ची झलक बघण्यासाठी माहूर येथील हेलिपॅडवर तरुणाईने एकच गर्दी केल्याने पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षकांची काही काळ तारांबळ उडाली.
सारखणी येथील अखिल भारतीय गोर बंजारा लेंगी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमदार निवास चित्रपट चे निर्माते निर्देशक संजीव कुमार राठोड यांनी किनवट माहूर तालुक्याच्या मातीशी असलेले ऋणानुबंध जपत संत सेवालाल महाराज जयंती चे औचित्य साधून बंजारा समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सैराट फेम रिंकू राजगुरु उर्फ आर्ची या प्रसिद्ध नटीला कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन माहूर किनवट सारख्या आदिवासी व डोंगराळ भागातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी जनतेच्या भेटीला आणल्याने येथील नागरिकांना आर्चीला बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, त्यामुळे माहूर येथील हेलिपॅडवर आर्चीचे आगमन होताच तरुणांनी एकच जल्लोष करत आपल्या पद्धतीने आर्चीचे स्वागत केले.तर माहूर नगरीच्या प्रथम नागरिक कु.शीतल जाधव,माजी नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी, राष्ट्रवादी चे माहूर तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला.स्वागत स्वीकारल्यानंतर आर्ची आपल्या ठराविक कार्यक्रमासाठी सारखानी कडे रवाना झाली.