जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा तमाम मराठी माणूस आणि शिवसैनिक करत होता, तो क्षण अखेर उजाडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली.
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अधिकार वाचवण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आहोत, असे मत दोन्ही नेत्यांनी ठामपणे मांडले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना खासदार संजय राऊत भावूक झाले. आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आला, तसाच आज मराठी ऐक्याचा हा मंगल कलश उद्धव आणि राज यांच्या रूपाने आला आहे. महाराष्ट्राला केवळ ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि आजच्या या युतीमुळे मुंबईसह सर्व महापालिकांवर भगवा फडकणे आता निश्चित आहे, असे संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी भाजपच्या नरेटिव्हवर जोरदार टीका केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी रक्त सांडले आहे. आज दिल्लीतील सत्ताधीशांच्या डोळ्यांत मुंबई खुपत आहे. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि आता हे नाते तुटणार नाही. जे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचा राजकारणातून खात्मा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाजप म्हणतेय कटेंगे तो बटेंगे, पण मी सांगतो – चुकाल तर संपाल. मराठी माणसाने आता एकत्र येण्याची वेळ आली आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या युतीमागची वैचारिक भूमिका स्पष्ट केली. मी पूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तीच या युतीची ठिणगी होती. सध्या राज्यात राजकीय पक्ष पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला स्थिरतेची गरज आहे. ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. मुंबईची युती ही पहिली पायरी आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच युतीचाच असेल, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
महादेव जानकरांच्या पक्षाची काँग्रेससोबत आघाडी….