माहूरचे कोरोना बाधित रुग्णा मुळे माहूरसह महागाव उमरखेड तालुक्यात खळबळ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार.
९४२३६५२४६३
हिवरा (संगम)
उमरखेड तालुक्यातील धानोरा येथील एक इसम म माहूर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मालवाडा येथे आपल्या मुली व जावयाला भेटण्यासाठी गेला होता. तो धानोरा येथुन एका दुधाच्या वाहनांमध्ये महागाव तालुक्यातील धनोडा पर्यंत आला होता. व तिथून तो पैनगंगा नदी वरील पूल पैदल पार करून केरोळी शेकापुर लांजी पर्यंत पायी चालत गेला व तिथून जावयाने त्याला मोटरसायकलवरून मालवाडा येथे नेले. पण या दरम्यान तो दुधाचा वाहनातील व्यक्तीच्या संपर्कात आला व हे दूध कोण कोणत्या गावात वितरित झाले त्याचबरोबर दिनांक 6 मे पर्यंत तो आपल्या राहत्या घरी धानोरा इथे होता यादरम्यान तो कोणाकोणाच्या संपर्कात आला त्याचबरोबर आपल्या मुलीच्या घरी आल्यानंतर तिथेसुद्धा अनेक जणांच्या संपर्कात आला असेलच त्याचबरोबर या व्यक्तीचा जावई हा सुद्धा माहूर बाजारपेठेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारा असल्याने माहूर शहरात त्याच्या संपर्कात आलेल्या लोकात खळबळ उडाली आहे.त्यामुळे उमरखेड तालुक्यातील धानोरा येथून त्याचा चालू झालेला प्रवास हा विविध गावा मार्फत मालवाडा पर्यंत झाला आहे त्यामुळे धानोरा या गावासह उमरखेड तालुक्यातील तसेच लगतच्या महागाव तालुक्यातील व माहूर तालुक्यातील सुद्धा अनेक गावात या प्रकारामुळे प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसापासून निश्चिंत असलेले माहूर परिसरातील तालुके मात्र आता कोरोणाच्या भीतीने धास्तावले आहे.
यामुळे या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना कोरंटाईन करून या सर्वांचे स्वैब अहवाल घेणे अत्यंत गरजेचे झाले असून आता प्रशासनापुढे हे आव्हान झाले आहे.
ग्रामीण भागात कोरोणा या संसर्गजन्य आजाराबद्दल अजूनही काही लोक गंभीर नव्हते पण काल माहूरला सापडलेल्या पॉझिटिव पेशंट मुळे कोरोनाला हलक्यात घेणारे मात्र सतर्क झाले आहे. त्याचबरोबर भारत सरकारने सर्वांना बंधनकारक केलेले आरोग्य सेतु या ॲप मध्ये हिवरा येथे अनेकांच्या मोबाईल मध्ये एक किलोमीटर परिसरात कोवीड१९ पेशंट असल्याचे दाखवत आहे यामुळेही संभ्रमाची स्थिती निर्माण झालीआहे.आरोग्य विभागाने याबाबत त्वरित खुलासा करून जनतेमधील संभ्रमाची स्थिती दूर करावी. यादरम्यान मात्र अनेक लोक परिसरातील आपल्या आप्तस्वकीयांना काळजीपोटी सोशल मीडिया व फोनच्या माध्यमातून काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आव्हान करताना दिसत आहे.