महागाव नगरपंचायत सत्तास्थापनेत भाजपाच ठरणार किंगमेकर ; “पॉलिटिक्स स्पेशल” चा एक्झिट पोल 70% खरा उतरला ; काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रितेश पुरोहित
महागाव :-
आज महागाव नगरपंचायत चा निकाल जाहीर झाला त्यापूर्वी पॉलिटिक्स स्पेशल ने 17 ही जागा चा एक्झिट पोल दिला होता त्यापैकी पाच जागा वगळता इतर 12 जागा चे निकाल एक्झिट पोल नुसार तंतोतंत खरे ठरले व काँग्रेसला सात जागा अपक्षाला एक जागा मिळणार हे ही भाकीतही तंतोतंत खरे ठरले.
महागाव नगरपंचायत मध्ये विजयी उमेदवारांची नावे खालील प्रमाणे
काँग्रेस (सात)
1) सौ.जयश्रीताई संजय नरवाडे
2)सौ रुपालीताई कोल्हेकर
3)श्री शैलेश दिलीप
सुरोशे(कोपरकर)
4)महेश गजानन पाटील
5) मो. परवेज सुरया
6) सौ सुरेखाताई विनोद सुरोशे(कोपरकर)
7) जयश्रीताई अशोक इंगोले
अपक्ष (एक)
1)सौ सुनंदाताई दिलीप सुरोशे (कोपरकर)
शिवसेना (पाच)
1) रामराव पाटील नरवाडे 2)विशाल पांडे
3) प्रमोद उर्फ शाखा भरवाडे 4)सौ.सुनिताताई शिवाजी डाखोरे
5) सौ.करुणाताई नारायण शिरबीरे
भाजप (चार)
1) सौ.रंजनाताई दीपक आडे 2)गजानन साबळे
3)सौ आशाताई शंकर बावणे
4) सुरेश उत्तमराव नरवाडे
काँग्रेस अपक्षाच्या मदतीने आठ जागा पर्यंत जाणार तरीही त्यांना बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे कारण बहुमत ९चे आहे. नगरपंचायत मध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण निघाल्या नंतरच युती, महाविकास आघाडी किंवा इतर कोणतेही सूत्र तयार होईल. यापूर्वी अडीच वर्षे ओपन पुरुष व त्यानंतर एस. सी. महिला असे आरक्षण होते त्यामुळे आता ओपन महिला किंवा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सूटण्याची दाट शक्यता आहे.काँग्रेसकडे सात जागा असूनहीअपक्ष ही काँग्रेसचा आहे तरीही एक जागेसाठी मोठे राजकारण होण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षाचा अनुभव बघता शिवसेना काँग्रेस सोबत जाण्याचे संकेत कमी आहेत त्यामुळे काँग्रेस भाजपची साथ घेऊन सत्ता स्थापन करू शकते आणि भाजपाला उपाध्यक्षपद देऊ शकते
जर शिवसेनेला काँग्रेसला सत्तेच्या बाहेर ठेवायचे असेल तर शिवसेना भाजपाला अध्यक्षपद देऊन स्वतः उपाध्यक्षपद स्वीकारून सत्तास्थापनेची खेळी करू शकते त्यामुळे अध्यक्ष निवडीचे राजकारणात सत्ता स्थापनेसाठी एकमेकांना रोखण्याचे समीकरण होण्याची दाट शक्यता आहे. महागाव नगरपंचायत मध्ये भाजप सत्ता स्थापनेमध्ये किंगमेकर ठरणार यात मात्र काही शंका नाही….