फुलसावंगीत ८ दुकानांना भीषण आग, संपूर्ण दुकान जळून खाक, २० लाखांचे नुकसान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
रियाज पारेख : ९६३७८८६६६
महागाव :
तालुक्यातील फुलसावंगी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या , कापड , टेलरिंग , डेली निड्स आणि मसाले दुकानाला रात्री अचानक लागली. या आगीत तब्बल ८ दुकाने जळून राख झाली आहेत.ही घटना आज सकाळी ३ च्या सुमारास उघडकीस आली असून २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
(वरील लिंक वर पाहू शकता घटनेचा व्हिडिओ )
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून फुलसावंगी सुप्रसिद्ध आहे . ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ दुकानांचे गाळे आहे. मध्यरात्री ३ च्या सुमरास अचानक या दुकानांना आग लागली.त्यामध्ये
महेताब खान दिलावर खान यांच्या मालकीचे डेली निड्स, शेख फारुख शेख ईनुस (कापड दुकान), सैय्यद सत्तार सैय्यद हबिब (मसाल्याचे दुकान), संजय नारायण धकाते (टेलर दुकान), शंकर नारायण वाठोरे (टेलर दुकान) , गजानन सुरेश कृष्णापुरे (टेलरिंग दुकान), जांबुवंत माधवराव जाधव(कापड दुकान), प्रमोद प्रकाश उटणे(कापड), यांची एकूण ८ दुकाने जळुन बेचिराख झाली आहेत.या आगीत २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
( आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आलेले अग्निशामक दलाचे वाहन )
दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.तर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उमरखेड नगरपरिषद चे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.परंतु आगीचे रौद्र रूपाने ८ दुकाने भस्मसात केली.आगीचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी दुकानांच्या मागे रिकाम्या बॉटल आढळल्या त्यामध्ये ज्वलनशील द्रव पदार्थ असल्याची दुर्गंधी येत असल्याची प्रथमदर्शी यांनी सांगितले.त्यामुळे हा घात की घातपात अद्यापही स्पष्ट झाले नाही.