महागाव तालुक्यात कॉरंटाइन केलेल्या इसमावर पहिला गुन्हा
हिवरा येथील घटना ; महागाव पोस्टे ला गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार
९४२३६५२४६३
हिवरा
हिवरा येथील राजू दत्ता राकडे हा इसम काम करण्याकरता बाहेरगावी गेला होता परंतु दिनांक ६.५.२०२० ला तो हिवरा येथे वापस आला गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती ने त्याची तपासणी महागाव येथे करून त्याला होम कोरंटाईन करण्यात आले होते.
त्याला स्वतःचे घर नसल्यामुळे ग्रामपंचायतीने त्याची व्यवस्था शाळेमध्ये केली होती.परंतु तो नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एमआय शेख ,पोलीस पाटील प्रवीण कदम ,व ग्राम विकास अधिकारी व्हि.डी.सावळकर यांनी अनेक वेळा समजावून सांगितल्यावरही तो ऐकत नव्हता व गावांमध्ये फिरत होता त्याच्या फिरण्यामुळे त्याच्या पासून कोरोणाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याने संसर्ग रोखण्यासाठी शेवटी आपत्ती व्यवस्थापन समितीने महागाव पोलीस स्टेशन कडे धाव घेतली . सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे विनंती पत्र महागाव पोलिस स्टेशन कडे केले. यावरून महागाव पोलिसांनी राजू दत्ता राखडे यावर भादंवी.१८८,२६९,२७० अन्वये गुन्हे दाखल केले आहे. कोरंनटाईन व्यक्तीवर गुन्हे दाखल होण्याचा हा महागाव तालुक्यातील पहिलाच प्रसंग असावा.

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….