अमरावतीमधील भाजप नेत्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली ; रुग्णालयात दाखल , कोरोना झाल्याचा अंदाज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती शहरात राहणाऱ्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याचेही कळते आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत असून त्यांची स्वॅब टेस्टही झाल्याचं कळाले आहे. या चाचणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणीही अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही.
माजी आमदार आणि काही काळ मंत्री असलेल्या या भाजप नेत्याची प्रकृती पाच दिवसापूर्वी खालावली होती. त्यामुळे त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालय येथे भरती करण्यात आले.
त्यांच्या गळ्याला त्रास होत असल्यामुळे संबंधित डॉक्टरांनी त्यांच्या स्वॅबचे नमुने घेतले होते. हे नमुने तपासल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले असे बोलले जात आहे. यामुळे त्यांना सोमवारी रात्री अमरावतीमधल्याच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना नागपूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी भाजप नेत्याला नागपूरला हलवण्यात आले. हा भाजप नेत्याच्या कुटुंबातील एकूण ३४ जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. नेत्याचे दोघे भाऊ दुसरीकडे राहत असून त्यांच्यावर सुध्दा देखरेख ठेवण्यात आली आहे.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….