आठवडाभरात बाहेरून आलेल्या दोन हजार लोकांची महागाव तालुक्यात एन्ट्री : हातावर शिक्के मारण्याचे काम सुरू
रियाज पारेख
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
बाहेरगावी गेलेले मजूर अन्य नागरिक परतीच्या प्रवासात निघाले आहेत अशा नागरिकाची संख्या आठवडाभरातच दोन हजाराच्या वर पोचली असून त्यांना कोरंटाइन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात महागाव येथे सुरू झालेले आहे शनिवारपासूनच महागाव येथील कोविड केअर सेंटर येथे हातावर शिक्के मारण्याचे काम सुरू झालेले आहे. दोन दिवसात दोनशेच्यावर नागरिकांच्या हातावर होम कॉरंनटाइन शिक्के मारण्यात आले आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जब्बार पठाण यांनी दिली आहे.
मुंबई, पुणे ,करमाळा ,सोलापूर ,सांगली, वर्धा ,ठाणे ,या ठिकाणावरून हे नागरिक महागाव तालुक्यात दाखल झालेले आहेत. अशा सर्व नागरिकाची नोंद महागाव येथे घेण्यात येत आहे. हे सर्व मिळेल त्या मार्गाने पायी(पैदल) मोटरसायकल अशा वाहनाने तालुक्या पर्यंत पोहोचलेले आहेत. यातील एकाही नागरिकांना संसर्ग आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत.
परंतु खबरदारीचे उपाय म्हणून त्या सर्वांना दोन आठवडे विविध ठिकाणी कॉरंटाईन करून ठेवण्यात आले आहे .हातावर शिक्के मारण्यात आलेल्या नागरिकांना चौदा दिवस बाहेर कुठेही फिरता येणार नाही. अशा नागरिकावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या गावच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे.
********************************
राजस्थान उत्तर प्रदेश जाण्यासाठी नागरिकांनी मागितली परवानगी महागाव तालुक्यातील सत्तर लोकांनी राजस्थानला जाण्यासाठी परवानगी मागितली आहे तसेच दहा लोकांनी उत्तर प्रदेश ला जाण्याची परवानगी मागितली आहे त्यांच्या मागणीनुसार सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अकोला पर्यंत सोडण्यात येणार आहे. महागाव येथे कोविड 19 केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये एकही रुग्ण भरती करण्यात आलेला नाही.
तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नायब तहसीलदार डॉक्टर संतोष आदमूलवार नायब तहसीलदार गजानन कदम तसेच नामदेव इसाळकर आरोग्य विभागाचे अधिकारी कार्य करत आहेत.