तळीरामांना दिलासा नाही ; यवतमाळ जिल्ह्यात मद्य विक्री बंद राहणार
जिल्हाधिकारी यांचे आदेश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने वाढत असून कोरोना विषाणूमुळे होणारा covid-19 आजाराबाबत यवतमाळ जिल्ह्यात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई दिनांक १३ मार्च २०२० च्या अधिसूचना नुसार राज्यात विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. व या विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात साथरोग अधिनियम १९८७ मधील खंड २, ३, ४ चीअंबलबजावणी अधिसूचनेच्या दिनांकापासून सुरू करण्यात आली आहे .ज्याअर्थी विषाणूंचा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून एका ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता संदर्भ क्रमांक दोनच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
तथापी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१)अन्वये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व किरकोळ व ठोक मद्य विक्री अनुज्ञप्ती ज्या स्थितीत बंदआहेत .त्या स्थितीत पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता १८६० (४५) कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारूबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील या आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करन्यात यईल असे आदेश जिल्हाधिकारी एम.देवेन्द्र सिंह यांनी नुकतेच काढले आहेत. त्यामुळे तूर्त तरी यवतमाळ जिल्ह्यातील तळीरामांना दिलासा मिळाला नाही.