अर्जुनी मोर. येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ
अर्जुनी मोर. ( संतोष रोकडे )
” 75 गरीब व गरजुंना दरदिवसी मिळणार पाच रुपयात भोजन ”
गरीब आणि गरजू लोकांसाठी भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ न्यू मुन्नाभाई सावजी भोजनालय अर्जुनी-मोर येथे 14 एप्रिल रोजी करण्यात आला.
शिवभजन योजनेचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड निरीक्षक महादेव तोदले नगरपंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव ,अन्नपुरवठा विभागाचे श्री.काळे,राऊत,विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे, शिवसेनेचे संजय पवार, नगरसेवक प्रकाश उईके, अश्विन गौतम, व पत्रकार मंडळी उपस्थित होते.
सध्या कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव असल्याने तथा लाॅकडाऊन असल्याने सर्व कामकाज व मजुरीचे कामे बंद आहेत.घरीच राहा सुरक्षित राहा याप्रमाणे दररोज कमावून खाणारे यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी गरीब व गरजुंना मदत करण्यासाठी हात पुढे केले आहेत.प्रशासनाने सुध्दा कुणी उपाशी राहु नये म्हणून पुढाकार घेतला आहे. अशातच आज अर्जुनी मोर. येथे न्यु मुन्नाभाई सावजी भोजनालयात शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. गरीब व गरजुंना शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येनार असुन पाच रुपयात शासनाच्या निकषांनुसार वरण भात भाजी पोळी देण्यात येणार आहे. दरदिवसी सध्या 75 थालीचे शिवभोजन देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त आहे.