तंत्रज्ञानाचा उपयोग करून 500च्या वर विद्यार्थी घेत आहेत ऑनलाइन शिक्षण
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
आ. विनोद अग्रवाल यांचा प्रयत्नातून घरी बसल्या घडत आहे विद्यार्थ्यांचे भविष्य
गोंदिया:- संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूमुळे थैमान मांडलेला असून एकीकडे विद्यार्थी घरी बसून लॉक डाउन उघडण्याची व शाळा सुरू होण्याची वाट बघत असताना गोंदिया विधानसभा क्षेत्रात मात्र चित्र काही वेगळेच दिसून येत आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी घरी बसल्या ऑनलाईन शिक्षणाची सुविधा करण्यात आलेले आहे. रोहित अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व सिद्धिविनायक या खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूट च्या मदतीने या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात करण्यात आलेले आहे. ज्यात वैद्यकीय स्पर्धा परीक्षा असलेली नीट व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा असलेली जेईई तसेच एमएच- सीइटी या स्पर्धा परीक्षांची रोज चार तास ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जात आहे. आयआयटी खडकपूर आयआयटी पवई येथून शिक्षण प्राप्त उच्चशिक्षित तज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान दिले जात आहे. विशेष म्हणजे हे गोंदियातिलच नाही तर संपूर्ण भारतातील पहिले असे उपक्रम म्हणून नावारूपास आलेले आहे. अद्याप कोणत्याही शिक्षण संस्था किंवा खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूट कडून असली ऑनलाईन घरी बसल्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा नसल्याची माहिती सिद्धिविनायक कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक जलज येडे यांनी दिली. सध्या पर्यंत या ऑनलाइन क्लास साठी 560 विद्यार्थ्यांनी नोंदणी करून नियमित जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणिताचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना जास्तीत जास्त संख्येत लाभ घेण्याचे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शिक्षक क्लास मधून शिकवत असताना विद्यार्थी मात्र घरी बसून आपल्या मोबाइल इंटरनेटचा वापर करत शिक्षण ग्रहण करताहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडल्यास त्या प्रश्नांचे निराकरण सुद्धा त्यांना लगेच शिक्षकांना प्रश्न करून केला जात आहे. विद्यार्थ्याला असं फोनवरून शिकत असताना बघून पालक सुद्धा कुतुहलाने या सर्व प्रकरणाला बघत आहेत. मात्र 24 तास घरी बसून पुस्तकाला हात न लावणारा आणि दिवसभर मोबाईल मध्ये गेम खेळणारा विद्यार्थी आज अभ्यास करत आहे आणि हे सर्व आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून घडत आहे याचा समाधान पालक वर्ग व्यक्त करत आहेत.