वृद्ध नागरिकांनी मदतीसाठी एल्डर लाईन-14567 चा लाभ घ्यावा :- जिल्हाधिकारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 21 मार्च, :- ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन – 14567 सर्व राज्यात सुरू करण्यात येत आहे. सदर हेल्पलाईन ही राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन यांच्यामार्फत संयुक्तरित्या चालविली जाणार आहे.
ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरूपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार देणे, बेघर वृद्धांना वृद्धाश्रमांमध्ये निवारा प्रदान करणे तसेच त्यांना कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न या हेल्पलाईनद्वारे करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे एल्डर लाईनच्या प्रतिनिधींचे समन्वय साधण्याचे व जिल्ह्यातील वयोवृद्धांसाठी सेवा प्रदात्यांच्या व संस्थेच्या मुलभुत माहितीच्या संकलनात सहकार्य करतील.
तरी जिल्ह्यातील वृद्ध नागरिकांनी मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पालाईन 14567 चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..