गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- “गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शाई आणि सुपारी फेकण्यात आल्याची घटना शनिवारी घडली.
या घटनेमुळे जालना शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे ज्या गाडीत शाई फेकण्यात आली, त्या गाडीत सदावर्ते यांच्या पत्नी आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.ही घटना जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली. गुणरत्न सदावर्ते हे आज जालना दौऱ्यावर आले असताना काही मनसैनिकांनी त्यांच्या वाहनाला लक्ष्य केले.
या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच चंदनझिरा पोलिसांनी मनसेच्या पाच ते सहा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षाचालकांच्या मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….