‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं, ते आमचं सर्वस्व आहे. परत जर आमच्या गुरुवर्यांना काही बोलला ना तर लक्षात ठेव असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाहीफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दशक्रिया विधीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गेलेल्या लवांडे यांना परतत असताना निर्जनस्थळी अडवून हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे यांच्यासह काही गुंडांनी हा हल्ला केल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे. या घटनेत त्यांच्यावर शाहीफेक करत मारहाण करण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
दशक्रिया विधीनिमित्त आयोजित कार्यक्रमावरून परतत असताना निर्जनस्थळी अडवून लवांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. संग्राम भंडारे यांच्यासह काही जणांनी लवांडे यांना अडवल्याचे व्हिडिओमधून दिसते आहे. तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं, ते आमचं सर्वस्व आहे. परत जर आमच्या गुरुवर्यांना काही बोलला ना तर लक्षात ठेव असं म्हणत त्यांच्यावर संग्राम आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोंघांकडून शाईफेक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….