विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “तामिळनाडूमधील 2026 च्या विधानसभा निवडणुकांचे अनपेक्षित निकाल लागले असून अभिनेता थलापथी विजय हा राजकीय पटलावरील खरा हिरो ठरला आहे.
मात्र स्पष्ट बहुमत कोणालाच न मिळाल्याने तामिळनाडूच्या राजकारणात रोज वेगवेगळ्या नाट्यमयी घडामोडी घडत आहेत. विजयच्या ‘तमिळगा वेट्री कझगम’ म्हणजेच टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत चमत्कारित यश मिळवलं. 234 पैकी 108 जागांवर टीव्हीकेने विजय मिळवला. टीव्हीकेला बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता आहे. सध्या टीव्हीकेकडे स्वतःचे 108 आणि काँग्रेसच्या 5 आमदारांचे समर्थन आहे. इतर जुळावजुळव करुन त्यांना 8 मेपर्यंत 116 आमदारांचं समर्थन मिळालं आहे. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजयला 3 वेळेस शपथ देण्यास नकार दिला आहे. राज्यपाल आधीच बहुमत सिद्ध करण्याच्या अटीवर अडून बसले आहेत. 118 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिल्याशिवाय शपथ घेऊन देणार नाही, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. प्रचलित परंपरेनुसार शपथ घेतल्यानंतर बहुमत विधान सभेत सिद्ध केले जाते. शपथ घेतल्यानंतर काही दिवसांचा अवधी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला जातो. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांत कायमच राज्यपालांची भूमिका वादग्रस्त राहिली आहे. अशातच तामिळनाडूच्या राज्यात महाराष्ट्रातील एक नाव किंगमेकर ठरणार असल्याचं समोर आलं आहे.
अचानक अनेक लहान पक्षांना महत्त्व का आलं?
सरकार स्थापनेस वेळ लागत असल्याने विजयला सत्तेपासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीएमके हे दोन्ही द्रविड पक्ष सक्रिय झालेत. एकमेकांचे कट्टर पारंपरिक शत्रू असलेले डीएमके आणि एआयएडीएमकेने विजयला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्यात. या परिस्थितीत तीन मुख्य पक्षांसोबतच निवडणुकीमध्ये अगदी एक आमदार जिंकून आणण्याऱ्या सर्वच लहान पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यातील एक पक्ष आहे विदुथलाई चिरुथिगल कच्ची (व्हीसीके) पक्ष आहे. व्हीसीके म्हणजे लिब्रेशन पँथर पार्टी असे या पक्षाचे नाव आहे. हा तामिळनाडू राज्यात निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त असलेला पक्ष आहे. या पक्षाचे सध्या लोकसभेत 2 खासदार आहेत. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत 2 आमदार निवडून आले आहेत. या आधी 2021 साली 4 आमदार निवडून आले होते. परंतु विजय जोसेफच्या टीव्हीके पक्षाच्या लाटेत या पक्षाला 2 आमदारांचे नुकसान झाले आहे.
कोणासोबत जायचं यावरुन ‘थांबा आणि वाट पाहा’ भूमिका
विजयने या पक्षाचे अध्यक्ष खासदार डॉ. थोल थिरुमावलवण यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी समर्थनाची मागणी केली आहे. तसेच मंत्रिपदाच्या रूपाने सत्तेत वाटा देण्याची ऑफर सुद्धा दिली आहे. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष डॉ. थिरुमावलवण यांच्या भूमिकेकडे लागले आहे. परंतु व्हीसीके सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र आल्यास त्यांच्यासोबत जायचं हे अद्याप त्यांनी जाहीर केलेले नाही. परंतु विजयसोबत जाण्यास विचारधारेचा अडचण येणार नाही. विजय हे धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांचे आहेत असे त्यांनी सांगितले आहे. सध्या ते डीएमकेसोबतच्या आघाडीत आहेत. सीपीआय, सीपीआय(एम) या दोन डाव्या पक्षांचे प्रत्येकी 2, व्हीसीके चे 2 व मुस्लिम लीगचे 2 असे एकूण 8 आमदार टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर एकत्रित निर्णय घेणार असल्याचे डॉ. थिरुमावलवण यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र कनेक्शन
डॉ. थिरुमावलवण 1990 सालापर्यंत महाराष्ट्रातून, मुंबईतून तयार झालेल्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील भारतीय दलित पँथरच्या चळवळीचं काम तामिळनाडू राज्यात करत होते. 1990 साली झालेल्या रिपब्लिकन ऐक्यात रामदास आठवले यांनी आपली भारतीय दलित पँथर संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये विलीन केली. त्यानंतर 1992 सालापासून डॉ. थिरुमवलवण यांनी विदुथलाई चिरुथिगल कच्ची म्हणजे लिब्रेशन पँथर पार्टी या नावाने आपली चळवळ सुरू केली. 1999 साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. 2001 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. तर 2009 साली ते पहिल्यांदा लोकसभेत गेले. सध्या त्यांची लोकसभेची तिसरी टर्म सुरू आहे.
तामिळनाडूच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचा किंगमेकर
डॉ. थिरुमावलवण यांचा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अन्निहिलेशन ऑफ कास्ट’च्या विचारधारेवर आक्रमकपणे पँथर स्टाईलने काम करतो. दलितांवरील जातीय अत्याचारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारा पक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच तामिळनाडू राज्यात भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचे सर्वात मोठे शत्रू अशी त्यांची ओळख आहे. तमिळ अस्मितेसाठी सुद्धा ते संघर्ष करत असतात. म्हणून त्यांना “इळूची तामिळार” म्हणजे तमिळींच पुनरुत्थान करणारा नेता असेही म्हटले जाते. तसेच आपल्या विचारधारेचा बाबतीत कुठलीही तडजोड न करणारा नेता म्हणून थिरुमावलवण यांचा सर्व डाव्या व धर्मनिरपेक्ष पक्षांवर प्रभाव आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रात, मुंबईत तयार झालेल्या दलीत पँथरच्या चळवळीतून तयार झालेला हा लिब्रेशन पँथर पक्ष (व्हीसीके) सध्या तामिळनाडूच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असून किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….