सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती पोटिनवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
या रिक्त जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण जाणार? याची चर्चा रंगली आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ६ नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये जय पवार आणि छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीत कुणाला पाठवते? याकडे राज्याच्या नजरा खिळल्या आहेत. पार्थ पवार याआधीच दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. जय पवार राज्यातच थांबणार की केंद्रात जाणार? याकडेही कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यसभेसाठी कुणाच्या नावाची चर्चा?
छगन भुजबळ आणि जय पवार यांचे नाव राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आघाडीवर आहे. त्याशिवाय आनंद परांजपे, अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील या जागेसाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. आढळराव पाटील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यांचा शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) चे अमोल कोल्हे यांच्या विरोधात पराभव झाला होता. ते आता राज्यसभेसाठी प्रयत्न करत आहेत.
छगन भुजबळ काय म्हणाले ?
सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्या राज्यसभेच्या जागी कोण जाणार? या चर्चांना जोर चढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पक्षाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नियमांनुसार आमदार झाल्यावर राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी आपला राजीनामा दिला. तुम्ही राज्यसभेवर जाणार का? यावर बोलताना ते म्हणाले की, यावर पक्षांतर्गत चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. स्वतःहून ती जागा मागणे अनुचित ठरेल. पण पक्षाने घेतलेला कोणताही निर्णय मी स्वीकारेन.
फक्त १८ महिन्यांचा कालावधी –
सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या राज्यसभेच्या जागेचा कार्यकाळ दीड वर्ष शिल्लक आहे. बारामती लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर सुनेत्रा पवार जून २०२४ मध्ये राज्यसभेत दाखल झाल्या होत्या. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्याजागी आता कुणाची वर्णी लागणार, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..
सुवेंदू अधिकारींनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ….
थलपती विजय यांच्यासोबत मोठा ‘गेम’! शपथविधीवर पुन्हा ग्रहण; बहुमताचं गणित कसं बिघडलं..?
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?