रब्बी हंगामासाठी अधर पुस प्रकल्पाचे पाणी सोडा ; राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
रब्बी हंगामात सिंचन करण्यासाठी अधर पुस प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असुन शेतामध्ये गहू, हरभरा,भुईमूग या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या अधर पुस प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्यात यावे. त्यामुळे या कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या वेणी, सवना,अंबोडा, शिरपुर,
खडका,लेवा,बारभाई(तांडा),राऊतवाडी,हिवरा,ईजनी,पोहंडुळ,तिवरंग,चिखली,वाकान,मलकापुर या गावांमधील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असुन तत्काळ या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता महागाव यांना देण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तिवरंग गावचे उपसरपंच गुणवंत राठोड, रवी दमगिर,शुभम राठोड,अक्षय खरे,गणेश यमगर,सोहेल चव्हाण,दया कौडकर,आकाश कांबळे, आकाश राठोड,गजानन जाधव, नवनीत कस्तुरे,अमोल ठाकरे,गजेंद्र जामकर,निवृत्ती जगताप इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
महागाव भाजपा तालुकाध्यक्षांमुळे उमरखेड विधानसभेत होणार भाजपा उमेदवाराची पीछेहाट ?
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..