अबब…चोरट्यांनी मारला काजू बदाम वर डल्ला ; पोलिसांच्या निष्क्रितेवर प्रश्नचिन्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
मध्यरात्री बंद असलेल्या किराणा दुकानाच्या मागील बाजूस असलेला दरवाजा तोडून दुकानातून काजू ,बदाम , गोडंबी, सुपारी, चहा पत्ती,मसाले आणि नगदी रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज (ता.१४) सकाळी ७ वाजता महागाव तालुक्यातील मोरथ येथे उघडकीस आली आहे.त्यामुळे महागाव तालुक्यातील वाढती गुन्हेगारी आणि चोरीच्या प्रकरणाने महागाव पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार , सय्यद अली अकबर अली हे नेहमी प्रमाणे आपले किराणा दुकान बंद करून घरी गेले.

त्यानंतर मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेला दरवाजा तोडून काजू ३.५०० कीलो किलो ,बदाम २.५ किलो गोडंबी ३ किलो, सुपारी ५ किलो ,चहा पत्ति ५ किलो, मसाले व नगदी रोकड १८ हजार असा अंदाजित ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.याबाबत सय्यद अली अकबर अली यांनी महागाव पोलिसांत तक्रार दिली असून वृत्त लिहेपर्यंत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….