नगरसेवक रामराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
नगरविकास आघाडीचे नेते तथा नगरपंचायत नगरसेवक रामराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आरोग्य शिबिर आयोजित (आज ता.१४) करण्यात आले होते.
पुसद येथील प्रसिध्द आयकॉन हॉस्पिटल यांच्या विद्यमान नगरपंचायत परिसरात हे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरिफ सुरेय्या , हे होते.
विकास पुरुष म्हणून रामराव पाटील यांच्याकडे पहिले जाते. महागाव नगरपंचायत अस्तित्वापूर्वी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदही त्यांनी भूषविले होते.अल्पावधीत त्यांनी महागाव शहरात विविध कामे शासन स्तरावरून खेचून आणली.नगरपंचायत च्या पहिल्याच निवडणुकीत स्वतंत्र पॅनल स्थापन करून निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आले.याच नेत्यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या चाहत्यांकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पुसद येथील आयकॉन हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय तज्ज्ञांनी शिबिरात सहभागी झाले होते.यामध्ये हृदयविकार तज्ञ , मधुमेह , थायरॉईड , किडनी , आजार असलेल्या रुगांनी मोफत चाचणी करून घेतली.यामध्ये विशेषतः लहान मुलांसाठी बालरोग तज्ञ पाचारण करण्यात आले होते.यामध्ये आयकॉन हॉस्पिटल चे डॉ.आदित्य सौंदणकर ( एम. डी.), डॉ.राहुल राठोड ( एम.बी.बी एस) , डॉ.राहील जाधव , (एम. डी.).डॉ.सुदर्शन ठाकरे ( एम. डी.), डॉ.साक्षी राठोड ( बी. डी.एस ), डॉ.अमोल नाईक ( एम. डी.) यांनी
रुग्णांची तपासणी केली.
या आरोग्य शिबिराचे आयोजक म्हणून नगरसेवक सुजित ठाकूर यांनी कामपहिले.
यावेळी नगराध्यक्षा करुणा नारायण शिरबिडे , उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे, नगरसेविका जयश्री संजय नरवाडे , नगरसेवक विशाल पांडे , आरोग्य सभापती प्रमोद उर्फ शाखा भरवाडे , आशा बावणे , सुनीता डाखोरे , रंजना आडे , भाजपा तालुकाध्यक्ष दीपक आडे , माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे , माजी नगरसेवक नारायण नरवाडे , बाळू वाकोडे , शिवसेना शहराध्यक्ष तेजस नरवाडे व आदी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….