बरे झालेल्या 61 जणांना सुट्टी;30 जणांची नव्याने भर
नेर 16, उमरखेड 13 व एक वणी शहरातील
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 61 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज (दि. 2) नव्याने 30 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 22 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. यात नेर शहरातील 12 पुरुष व चार महिला, उमरखेड शहरातील 10 पुरुष व तीन महिला आणि वणी शहरातील एक महिला पॉझेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत 425 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात रविवारी 30 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 455 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 61 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 394 आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1145 झाली आहे. यापैकी 722 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 29 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 115 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 224 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 19008 नमुने पाठविले असून यापैकी 15148 प्राप्त तर 3860 अप्राप्त आहेत. तसेच 14003 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

पाणीपुरवठा सभापती होताना उमाने घेतला आपल्याच नगरसेवकाचा बळी ; “शिकारे ची केली शिकार”
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात भाऊंची अकरा लाखांची दहीहंडी छम छमा छम
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….