झरी जामणी, राळेगाव, मारेगाव, महागाव, कळंब व बाभुळगाव नगर पंचायत आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 23 नोव्हेंबर :- यवतमाळ जिल्ह्यातील नगर पंचायत झरी जामणी, राळेगाव, मारेगाव, महागाव, कळंब व बाभुळगाव या नगर पंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले असून नगरपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, अमरावती यांचे दि. 22 नोव्हेंबर 2021 चे पत्रानुसार उपरोक्त सर्व नगरपंचायतींच्या आरक्षणास व झरी जामणीच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार आरक्षणाची अंतिम अधिसुचना संबंधीत नगरपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर व www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….