“इसिस काश्मिर” कडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी ; घराची सुरक्षा वाढवली…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीरला ( Gautam Gambhir ) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे . याबाबत गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे . तसेच , ‘ इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गौतम गंभीरने केला आहे . मिळालेल्या माहितीनुसार , दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे . डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की , गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे . गौतम गंभीर यांनी काल रात्रीच ही तक्रार दाखल केली आहे . इसिस काश्मीरने फोन आणि ई – मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला आहे .
दरम्यान , याआधीही दोन वर्षापूर्वी गौतम गंभीरने परदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगत पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती . त्यावेळी खासदार गौतम गंभीरने शहादारा जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक यांना पत्र लिहिले होते . यात गौतम गंभीरने ” मला आणि माझ्या परिवाराला परेदशी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत . याबबात मी तक्रार नोंदवली आहे . तरी माझी सुरक्षा वाढवण्यात यावी , अशी मागणी केली होती .
गंभीरचे क्रिकेट करिअर
गौतम गंभीरने भारतीय संघासाठी 58 कसोटी सामने , 147 एकदिवसीय सामने आणि 37 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत . 58 कसोटींमध्ये त्याने 41.95 च्या सरासरीने 4 हजार 154 धावा केल्या आहेत . तसेच , गौतम गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यात 39.68 च्या सरासरीने 5 हजार 238 धावा केल्या आहेत . तर 37 टी 20 सामन्यांमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत . गौतम गंभीरने विश्वचषक 2011 मध्ये भारतीय संघासाठी 122 चेंडूंत 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती . त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 2011 वर्ल्ड कप जिंकला . मात्र गौतम गंभीरने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली….