कृषीच्या विद्यार्थ्यांनी दिले ग्रामस्थांना जलशुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ७२४९-४४४-८८८
उमरखेड:
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठांतर्गत उमरखेड येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थांना जलशुद्धीकरणाचे महत्त्व पटवून दिले. जलशुद्धीकरण करण्याबाबत प्रात्यक्षिकातून ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.
यावेळी कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या कोमल काळबंदी हिने पिण्याच्या पिण्याचे शुद्धीकरण कशाप्रकारे करावे, याबाबतचे प्रात्यक्षिक ग्रामस्थांना करून दाखवले. पावसाळ्यात गावातील पिण्याच्या पाण्याचे मुख्यस्त्रोत असलेल्या विहिरीमध्ये दुषित पाणी जमा होते. त्यामुळे जेव्हा नळाच्या माध्यमातून या पाण्याचा घरोघरी पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. तेव्हा दुषित पाण्यामुळे साथीचे अनेक रोग पसरतात. नकळत दुषित पाणी पिले गेल्यास. रोगांना आमंत्रण दिल्या जाते.ही समस्या उद्भवू नये म्हणून पिण्याच्या पाण्याचे शुद्धिकरण करणे आवश्यक असल्याचे कृषी विद्यार्थिनीने ग्रामस्थांना पटवून सांगितले. हा कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक उमरखेड तालुक्यातील कारखेड या गावात करण्यात आला. या प्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चींतले, आनंद राउत, वाकोडे व कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….