कृषीकन्ये कडून कारखेड येथे पशूंच्या लसिकरणाबाबत मार्गदर्शन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ७२४९-४४४-८८८
उमरखेड:
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यपीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या कोमल काळबांडे हीने कारखेड येथील शेतकऱ्यांना पशूंच्या लासिकरणासंबंधी मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पशुपालन हा एकमेव महत्वाचा मार्ग आहे. पावसाळ्यात जनावरांना विविध प्रकारचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यातही यावर्षी समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे नदया नाले दुथडी भरून वाहु लागले.पूर आला स्थिती उद्भवल्याने जनावरांत आजाराचे प्रमाण वाढण्याची संभावना मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये फर्या , घटसर्प,अन्य विषारी , काळ पुळी, मेंढ्यांची देवी, रेबीज, थायलेरियासिस, कोंबड्यांची देवी यांसारख्या अनेक आजारांमुळे जनावरे दगावली जातात. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.या घातक आजारापासून गुरांना वाचविण्यासाठी लसीकरण करणे खूप आवश्यक आहे.असे कोमल काळबांडे हिने पशुवैद्यकीय डॉ.बी.जी.तावडे व विषय तज्ञ सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी कृषी महाविद्यालय उमरखेड चे प्राचार्य एस.के.चींतले, विषयतज्ञ सचिन देशमुख व ग्रामीण कृषि कार्यक्रम अधिकारी आर.के.सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….