पालकमंत्री अशोकराव चव्हाण गुरूवारी जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड/माहुर (राजकिरण देशमुख) :-
संततधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण गुरूवारी ९ सप्टेंबर रोजी पाहणी करणार आहेत.
मागील दोन दिवस नांदेड जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी तसेच जीवित हानी देखील झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते खचले असून, अनेकांच्या शेतात व घरात पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण बुधवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर तातडीने नांदेडकडे रवाना झाले. रात्री उशिरा ते शहरात दाखल होणार होतै. गुरुवारी ते जिल्ह्यातील परिस्थितीबाबत प्रशासनाशी चर्चा करणार असून, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवादही साधणार आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….