ईसापुर धरणाचा पाणीसाठा 93 टक्के ; कोणत्याही क्षणी पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
पैनगंगा नदीवरील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापुर धरण 93 टक्के भरले आहे. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे त्यामुळे जलाशयाचे पाणी पातळीत वाढ होत आहे. मुख्य अभियंता जलसंपदा विभाग औरंगाबाद यांनी दिलेल्या पत्रात कळविले की,ईसापुर धरणाचा जलाशय प्रचालन आराखडा मंजूर आहे. पाण्याचा येवा पाहता ईसापुर धरणाचा मंजूर जलाशय प्रचालन आराखडा (90% विश्वासहर्ता) नुसार 15-9- 2001 पर्यंत 440. 85 मीटर ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने ईसापूर धरणातून वक्रदाराद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडावे लागेल त्यामुळे नदी पात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून पेनगंगा नदी काठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहणे बाबत आपल्या अधिनस्त संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलिस विभाग यांना आपल्या स्तरावर सूचना देण्यात याव्यात असे कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक 1 नांदेड यांनी जिल्हाधिकारी नांदेड हिंगोली यवतमाळ यांना कळविले आहे.
●●●●●●
*आज दिनांक 08/09/2021 वेळ सकाळी 06वाजता जलाशयाची पातळी :- *440.27मि उपयुक्त साठा :- *895.21 द.ल.घ.मी टक्केवारी :- *92.86*%
*आजचे पर्जन्य :- 27 मि मी.१ जून पासूनचे एकूण पर्जन्यमान :- 750 मी मी मागील 24 तासातील येवा :- 30.11 दलघमी 1जून पासूनचा येवा 505.14 दलघमी*
■◆◆◆◆◆◆◆◆◆◆■
दिनांक 08/09/2021 वेळ-6.00 ईसापूर धरणाच्या वरची बाजू पाणलोट क्षेत्र
1.)पैनगंगा नदी वरील जयपूर बॅरेज जिल्हा वाशिम येथिल गेज व विसर्ग नोंद -पाणी पातळी- *74.80* मी.आणि *3* गेट पूर्णपणे वर उचलले असून
गेज- *3.80* मी.
विसर्ग- *393.36* क्यूमेक्स.( *3* गेटमधून विसर्ग.)
( *9 गेट पूर्णपणे बंद आहेत*.)
2.) इसापुर धरण सांडव्याचे सर्व गेट बंद आहेत.विसर्ग *निरंक* आहे.
*ईसापूर धरणाच्या खालची बाजू :*
3. )कयाधू नदीवरील डोंगरगाव ता. कळमनुरी पुलावरील नोंद.
गेज – *4.10* मी.
विसर्ग – *810.16* क्यूमेक्स.
4.) *पैनगंगा नदीवरील मार्लेगाव ता. उमरखेड पुलावरील नोंद.
गेज – *8.00* मी.
विसर्ग – *894.00* क्यूमेक्स.