त्या मृतकाची ओळख पटली ; घात की अपघात ? अद्यापही गुलदस्त्यात ; पोलिसही चक्रावले ; शवविच्छेन अहवालानंतर होणार उलगडा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आमणी रोडवरील एचपी गॅस एजन्सी गोडाऊन लगतील नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह काल सायंकाळी साडेपाच च्या सुमारास आढळला होता.त्यांनतर त्या मृतकाची ओळख पटली असून तो महागाव शहरातील इंदिरानगर येथे राहत असलेल्या अमर सकरगे याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने पोलिसही चक्रावले आहेत. अमरचा घात की अपघात हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.परंतु शवविच्छेन अहवालानंतर सदर तरुणाचा मृत्यू कशाने झाला ,हा घात की अपघात ? आहे. याचा मात्र उलगडा अहवालानंतर होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
अत्यंत हसमुख असलेल्या अमर हा काळी (टें) येथे आपल्या मामाच्या घरी राहत होता.मागील पाच ते सहा महिन्यांपासून तो आपल्या आई व लहान भावासोबत महागाव शहरातील इंदिरानगर येथे किरायाच्या खोलीत राहत होता.मात्र अचानक अमर हा बेपत्ता झाला होता.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितनुसार अमर दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची व भाऊ देण्यासाठी महागाव पोलीस स्टेशनला आले होते.मात्र त्याचा फोटो नसल्याने ते परत गेले.काही तासाने आमणीं रोडवर असलेल्या नाल्यात वास येत असल्याने ईविनिंग वॉक साठी गेलेल्या नागरिकांनी पाहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नागरिकांनी मृतदेह बघण्यासाठी गर्दी केली.परंतु मृतकाचे तोंड हे जमिनीत व विच्छिन्न अवस्थेत असल्याने नागरिकांना ओळख पटवता नाही .
अमर यांच्या आई व भावाने त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यावरून हा अमर असल्याची ओळख पटवली.मात्र अमर चा घात आहे की अपघात ? हे मात्र अद्यापही समजू शकले नाही.आज (०३) सकाळी सवना येथील शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात आले आहे. अमरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अमरचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांशी दुरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.