पुसद न. प प्रशासनाच्या व माजी नगरसेवकांच्या निष्क्रिय उदासीन धोरणामुळे आंबेडकर वार्डात जलसंकट ; मुबलक पाणी मिळावे म्हणून नागरिकांचे प्रशासना समोर ठिय्या आंदोलन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक समस्या निर्माण झाल्यामुळे येथे वास्तव्य करणारे नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर असे की शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड हे घाणीचे माहेर घर बनले आहे. या ठिकाणी मोठमोठाले कचऱ्याचे ठिगारे पहावयास मिळतात. सार्वजनिक नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने .सर्वत्र दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर परिसरात रोगराई निर्माण झाली आहे त्याबरोबर आता तर मुबलक पाणी मिळणे सुद्धा कठीण झाल्यामुळे, नागरिक हवालदिल झाले असल्याने सदर परिसरातील नागरिकांनी पुसद न .प प्रशासन व माजी नगरसेवकांच्या निष्क्रिय उदासीन धोरणा विरोधात पुसद न. प प्रशासनाला निवेदन देऊन कार्यालयातच ह्या गंभीर घटनेच्या निषेधार्थ पाण्यासाठी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाला मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून निवेदन दिले यावेळी निवेदनावर संतोष अंभोरे अध्यक्ष (भीमशक्ती संघटना) ,
यादव वाटे (अध्यक्ष गौतम बुद्ध विहार समिती ), मालाबाई गवई बंडू कांबळे, सरकार गौतम गायकवाड, महेश काळे, मायकल खंदारे ,गोदाजी खिल्लारे, यांचे सह असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत.